Monday, May 3, 2010


maza avadta kavi Saumitra urf Kishor kadam....
yachya kahi kavita jya mala majhya manachya far javalchya vattat....

एखाद्या पावसाळी दुपारी ...



एखाद्या पावसाळी दुपारी, मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो,
तेंव्हा तुझं हात माझ्या हातांमध्येच असतो,
खाली मान घालून तू गर्दी मधून चालत असतेस, तशीच माझ्यासोबत एका टेबलाशी बसते,
सगळी गर्दी तुझ्याकडेच अनिनिश नेत्रांनी पाहत असते,
मी ही फक्त तुझ्याकडेच, फक्त तुझ्याकडेच पाहत असतो,
तुझ्याशीच बोलत असतो, तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो,
अशासाठी कधीतरी एका पावसाळ्यात, एका दुपारी, सहज सोपं बोलत-बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत जेवायला तू येशील का ?

अशाच पावसात अर्धा भिजत, मी तुला सांभाळत-सांभाळत नेत असतो, एखाद्या अनोळखी शहराच्या रस्त्यावरून,
तू सावध चालत असतेस थोडी जवळ - थोडी दुरून,
आणि अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटून टाकतेस, टाकूनच देतेस,
मग माझं हात हातात घेऊन, रस्त्यात साचलेल्या पाण्यातून तू पाणी उडवत चालू लागतेस,
कडेकडेने वळचणीला उभे असलेले लोक, माझा प्रचंड हेवा करत पाहत असतात,
आणि मी मात्र तू छत्री मिटलीस दूर टाकून दिलीस, अशा पावसात माझ्यासोबत चक्क चिंब भिजत चाललीस म्हणून रस्त्यात साचल्या डबक्यावरून एखाद्या सुफी संतासारखा न बुडता चालत जातो, हरखून तुझ्याकडेच पाहत राहतो,
अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जायला येशील का ?

अशाच पावसाळी एका संध्याकाळी, समुद्रकिनारी ढगांमागे कुठेतरी,
सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना, समुद्राची गाज दोघांवरून पार होताना,
माझं झालं-गेलं उगाच मला आठवताना, गल्वरून माझे अश्रू पावसात मिसळून वाहताना,
तुझ्याकडे अशात पहाण्याच मी मुद्दाम टाळताना,
नकळत मी तुझा हात हातात घेतल्यावर, हळूच तू माझ्यकडे मान वळवून पाहिल्यावर,
माझ्या गालावरच पाऊस आणि अश्रू तुला वेगवेगळे निथळताना दिसल्यावर,
अश्रू पुसायला तू माझ्या गालांशी हात न्यावा, आणि तुझ्या बोटांत फक्त पाऊसच येत रहावा,
आणि तू खळखळून हसत माझ्या हि नकळत माझ्या मिठीत शिरावी,
आपण दोघे घट्ट बिलगत गाजेमधून विरत विरत किनाऱ्यावर फक्त हुरहूर उरावी,
अशासाठी पावासाळी कुठल्या तरी संध्याकाळी उधान भरती आल्यावर हुरहूर होऊन समुद्रावर जायला येशील का ?
दाट काळोख होशील का ?
तुझा चेहरा माझ्या सोबत काळोखाला देशील का ?


सारं आठवतय..........




सारं आठवतय

आपलं ते हॉटेलात जाण
तुझा हात माझ्या हातात घट्ट असण
लोकांनी आपल्या कडे पाहणं
तुझं लक्ष मात्र माझ्याकडे असण
cold drink पीता पीता
मला ठसका लागणं
"वर बघ" म्हणून तुझं
माझ्या पाठीवरून हात फिरवण
सारं आठवतय

आपण फिरत असताना
पावसाचही आपल्या भेटीला येणं
छत्री उघडत असताना
तू ती उघडू न देण
जाऊया ना भीझत असं तुझं सांगण
भिजत जात असताना
वळणाचा फायदा घेत तुझ्या
डोळ्यांनी माझ्या कडे काही तरी मागणं
"रस्त्यात" तुला माझं ते गमतीनं विचारण
तुझं तेव्हा मला बावळट बोलण
सारं आठवतय

आपल्या नेहमीच्या बाकावर बसणं
तिथे खांद्यवर डोकं ठेवून तुझं
"देशील ना मला साथ म्हणून"
नेहमी डोळ्यात पाणी आणून विचारणं
सारं आठवतय

असच सगळं अलबेल चालू असताना
तू मला भेटायला बोलावणं
हातात मेहंदी डाव्या हातात अंगठी
पाहून सगळं मला समजणं
तरीही मी तुला विचारणं
त्यावर जा मला विसरून म्हणून
तुझं ताडकन निघून जाणं
सारं आठवतय

तू जात असताना
माझं तुला डोळे भरून पाहणं
त्या मध्येही डोळ्यात पाणी येणं
तुझं साधं मागे वळूनही न पाहणं
सारं आठवतय
सारं आठवतय................

----------------------------------------------------------------





Some thoughts by me....


आताच या कविता वाचताना मी पुन्हा माझ्या आठवणीना बिलगले आहे..
एका वेड्या क्षणी जेव्हा मी हे सगळं अनुभवत होते तेव्हाचा हळवेपणा पुन्हा माझ्या उरात दाटला आहे..
आणि आज पुन्हा मी प्रेमात पडले आहे...
फक्त तुझ्याच...
माझं हळवेपण जपणारा तू
"नेहमीचा तू" आज खूप जवळचा वाटतोयस..
मनाने नादिष्ट असणं कधी कधी खुप सुखाचं असतं...
नाही?......................................

No comments:

Post a Comment