Friday, July 16, 2010


Its in female version....but doesn't matter I feel same for u................Grammatical mistakes r there but...its from heart....


थोडीशी थांब बघतर मागे वळून
कुठेपर्यंत आलो आहे मी
तुझ्या सोबत तुझ्या नकळत
थोडीशी थांब बघतर जरा
हे डोळे फक्त तुझीच वाट बघत आहे रात्रदिवस
थकलेत् ग ते
त्याना एकदा अलगद तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा
थोडीशी थांब बघतर जरा

तुझ्या नसन्याने तुझ्या असण्याचे महत्व कळला आहे मला
तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा
थोडीशी थांब बघतर जरा

तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व
सगळ सगळ मान्य मला
पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय
ते बघून तर जा जरा
थोडीशी थांब बघतर जरा

हा चंद्र सुद्धा हसतो मला
म्हणतो, ज्याला तू आमच्यात शोधत असतोस रात्र रात्र
तीही तुझ्यासाठी झुरतेय का अशीच
त्या चंद्राला उत्तर देऊन तर जा जरा
थोडीशी थांब बघतर जरा

आठवण तुलाही येते माझी
पापणी तुझी ही ओलवते अश्रूनी
त्या अश्रूना माझ्या ओंज़ळीत देवून तर जा जरा
थोडीशी थांब बघतर जरा

तुझ हसण तुझ बोलण
तुझा राग तुझ गप्प राहण
घेऊन गेलीस तुझ्याबरोबर तू सर्व
ज़गण्यासाठी तेवढेच आहे ग माझ्याकडे
माझ जगण देऊन तर ज़ा जरा...
थोडीशी थांब बघतर जरा

माझ्या ज़वळ थोड़ी बसतर जरा
माझा सहवास, माझा श्वास, माझी सोबत
अनुभव तर जरा
थोडीशी थांब बघतर जरा

प्ग मात म्हणे न सांगता न बोलता
सर्व काही कळत
मग न सांगता न बोलता
मला समजून तर घे जरा
थोडीशी थांब बघतर जरा

तुझ्यात स्वत:लाच हरवून
बसलो मी कुठेतरी
जरा येऊन मला माझेपन
शोधून तर दे जरा
थोडीशी थांब बघतर जरा

माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत
माझ्या प्रत्येक क्षणात तू आहेस
व्यापून टाकल आहेस तू मला
माझा एक एक क्षण
मला परत देऊन तर जा जरा
थोडीशी थांब बघतर जरा

एकदा, फक्त एकदाच माझ्या मनात डोकवून तर जा
स्वता:लाच बघितल्यावर कस वाटत
ते सांगून तर जा जरा...
थोडीशी थांब बघतर जरा

अळुवा वरच्या थेंबासारखा आहे ग हे आयुष्य... क्षणभंगुर
कुणी ते पाण हलवण्या आधी आणि तो इवलसा थेंब कुठेतरी लुप्त होण्याआधी
एकदा प्रेम करुन तर जा जरा...
शेवटची थोडीशी थांब
कसलीही अपेक्षा नाही... की कासलही बंध नकोत
प्रेम केल आहे तुझ्यावर... त्यात कसले व्यवहार नकोत
भावनाच फक्त कळतात ग मला
त्याचा पलिकडचे काहीही नको
एकदा त्या भावनाना स्पर्शून तर जा जरा
थोडीशी थांब बघतर जरा

ह्या वेड्याला थोडस शहाणपण शिकवून तर जा जरा.
थोडीशी थांब बघतर जरा